Breaking News

गव्हाण येथील मैदानात प्रीमियर लीग रंगली

आमदार प्रशांत ठाकूर यांची सदिच्छा भेट

पनवेल : रामप्रहर वृत्त
आई एकविरा स्टार्स व भावार्थ नाखवा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने गव्हाण प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन रविवारी (दि. 1) करण्यात आले होते. या स्पर्धेला भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत खेळाडूंना प्रोत्साहित केले.
गव्हाण येथील पाटणे मैदानात गव्हाण प्रीमियर लीग रंगली. या वेळी भाजप महिला मोर्चा तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, भाजप तालुका चिटणीस जयवंत देशमुख, युवा नेते निलेश खारकर, प्रमोद कोळी, विनायक कोळी, सुयोग कोळी, प्रशांत कोळी, रोशन कोळी, आकाश कोळी, सचिन कोळी, सुधीर कोळी, योगेश कोळी, स्वप्नील कोळी, आदेश कोळी, ऋतुराज कोळी, मिलिंद कोळी, सुरज कोळी, मंगेश कोळी, अविनाश कोळी, सुहास कोळी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, खेळाडू आणि क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.

Check Also

बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट

चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …

Leave a Reply