काय आहे क्रिकेट वर्ल्डकपचा इतिहास?

लंडन : वृत्तसंस्था

वर्ल्डकप 2019 स्पर्धेला 30 मे पासून सुरुवात होत आहे. या वर्ल्डकपचे यजमानपद इंग्लंडकडे आहे. विशेष म्हणजे इंग्लंडला आतापर्यंत एकदाही वर्ल्डकप स्पर्धा जिंकता आलेली नाही. टीम इंडियाने वर्ल्डकप 2 वेळेस पटकावला आहे, तर एका वेळेस उपविजेतेपद मिळालं आहे. वर्ल्डकपच्या निमित्ताने आपण काही रोचक माहिती जाणून घेणार आहोत.

क्रिकेट विश्वात वर्ल्ड चॅम्पियनशीपची सुरुवात 1912 ला करण्यात आली. ही सुरुवात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या देशांद्वारे करण्यात आली. या वर्ल्डकप चॅम्पियनशीपचे रूपांतर 1975 ला टेस्ट क्रिकेट खेळणार्‍या टीमसाठी स्पर्धेच्या रूपात आणल गेलं. पहिल्या वर्ल्डकप स्पर्धेत टेस्ट क्रिकेट खेळणार्‍या एकूण सहा देशांचा सहभाग होता. यामध्ये  इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, वेस्ट इंडीज, भारत आणि पाकिस्तान या देशांचा सहभाग होता. याव्यतिरिक्त श्रीलंका आणि पूर्व आफ्रिका या टीमचा देखील सहभाग होता.

क्रिकेट वर्ल्डकपची सुरुवात 1975 साली झाली. आतापर्यंत एकूण 11 वर्ल्डकप स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे. सर्वाधिक वेळा वर्ल्डकप जिंकण्याची कामगिरी ही ऑस्ट्रेलियाने केली आहे. ऑस्ट्रेलियाने पाच वेळा वर्ल्डकप ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाने 1999 पासून ते 2007 या दरम्यान 3 वर्ल्ड कप स्पर्धा खेळण्यात आल्या. हे तिन्ही वर्ल्डकप ऑस्ट्रेलियानेच जिंकल्या. यासोबतच त्यांनी वर्ल्डकप विजयाची हॅट्रिक साजरी केली, तसेच ऑस्ट्रेलिया गतविजेती वर्ल्डकप टीम देखील आहे. भारत आणि वेस्ट इंडीजने प्रत्येकी 2 वेळा, तर श्रीलंका आणि पाकिस्तानने प्रत्येकी 1 वेळा वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली आहे.

क्रिकेट विश्वात सर्वात आधी वेस्ट इंडिजचा बोलबाला होता. वेस्ट इंडिजने आपले वर्चस्व गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाने ही मक्तेदारी घेतली. ऑस्ट्रेलिया क्रिकेटमधील तगडी टीम म्हणून समोर आली. तेव्हाच्या काळात क्रिकेटर्स पांढर्‍या कपड्यांमध्ये खेळायचे, तसेच लाल बॉलचा उपयोग केला जायचा. 7 जून 1975 पासून पहिल्या वर्ल्डकप स्पर्धेची सुरुवात झाली होती. पहिला वर्ल्डकप 7 ते 21 जून दरम्यान इंग्लंडमध्ये खेळण्यात आला होता. विशेष म्हणजे तेव्हा 60 ओव्हरची मॅच खेळवण्यात येत असे.या वर्ल्डकपमधील पहिला सामना हा भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात खेळण्यात आला. या सामन्यात भारताचा पराभव झाला. या मॅचमध्ये लिटील मास्टर सुनील गावस्कर यांनी 174 बॉलमध्ये नाबाद 36 धावा केल्या होत्या. 1975 चा पहिला वर्ल्डकप वेस्ट इंडिजने जिंकला. वेस्ट इंडिजने या वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी केली होती.

Check Also

The member group is always indeed there to aid when needed

Partypoker are an extremely valued spouse for people. And greatest of all – the value …

Leave a Reply