Breaking News

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा वार्षिक क्रीडा मेळा उत्साहात

मान्यवरांची उपस्थिती; विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा वार्षिक क्रीडा मेळा रविवारी (दि. 5) मोठ्या उत्साहात झाला. त्याचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. या क्रीडा मेळ्यात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
क्रीडा मेळ्यात विद्यार्थ्यांनी 100, 200 आणि 400 मिटर धावण्याची शर्यत, क्रिकेट, कॅरम, बुद्धीबळ, व्हॉलीबॉल यांसारख्या खेळांमध्ये सहभागी होत चमकदार कामगिरी केली. त्याचप्रमाणे योग आणि पिरॅमिड परफॉर्मन्स सादर करून मंत्रमुग्ध केले.
क्रीडा मेळ्याच्या बक्षीस वितरण समारंभ लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे उपाध्यक्ष वाय. टी. देशमुख, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, माजी नगरसेवक अभिमन्यू पाटील, माजी नगरसेविका हर्षदा उपाध्याय भाजप नेते प्रभाकर जोशी, वर्षा ठाकूर, अर्चना ठाकूर, खारघर शहर सरचिटणीस दीपक शिंदे, विश्वकर्मा ठाकूर, गीता चौधरी, मुख्याध्यापिका राज अलोनी यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply