पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष संजय भगत यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून सोमवारी
(दि. 6) साजरा झाला. वाढदिवसानिमित्त गुरुशरणम परिसरातील वसाहतीमध्ये संजय भगत यांनी गरजूंना धान्याचे वाटप केले.
दरम्यान, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी संजय भगत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. माजी नगरसेवक अनिल भगत व अन्य मान्यवर उपस्थित होते.
धान्य वाटपावेळी राजेश विभाडीक, उमेश सामंत, सनिल मोहडे यांच्यासह रॉयल असोसिएशनचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. या वेळी धान्याचे वाटपाचा लाभ झालेल्या नागरिकांनी संजय भगत यांचे आभार मानले तसेच त्यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.
Check Also
लगान @२५ वर्षे; क्लासिक चित्रपट, ऑस्करला नामांकन…
काळ १८९३चा. म्हणजे आपल्या अखंड हिन्दुस्थानचा. दीडशे वर्षांपूर्वीचा…स्थळ आपल्या देशातील मध्य भागातील चंपानेर हे अतिशय …
RamPrahar – The Panvel Daily Paper