रूचिता लोंढे यांचा उपक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त
महिला स्वावलंबनासाठी पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका रूचिता लोंढे यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी प्राचीन युद्धकला प्राथमिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ बुधवारी (दि. 1) सामाजिक कार्यकर्त्या ज्योती कानिटकर यांच्या हस्ते करण्यात आला.
महिला स्वावलंबनासाठी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेविका रूचिता लोंढे यांनी पनवेल महापालिका प्रभाग क्रमांक 19 मधील महिलांसाठी मोफत लाठी-काठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजित केले आहे. लोकनेते दि. बा. पाटील शाळेच्या मैदानात मार्च ते मार्च या दरम्यान हे प्रशिक्षण शिबिर होणार आहे. यंदाचे या शिबिराचे दुसरे वर्ष असून यामध्ये वर्षाहून अधिक वय असलेल्या मुली आणि महिलांना प्राचीन युद्धकलेचे प्राथमिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या वेळी आयोजक माजी नगरसेविका रूचिता लोंढे, कल्पना राऊत, अॅड. वृषाली वाघमारे, राजश्री वावेकर, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, पूजा लोंढे, स्वाती कोळी, संध्या समेळ, प्रांजली काणे, पल्लवी जोगळेकर यांच्यासह इतर महिला उपस्थित होत्या.
Check Also
कलावंतांच्या रखडलेल्या मानधनाचा प्रश्न विधिमंडळात
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्यानंतर शासनाकडून सुधारणा व तातडीच्या कार्यवाहीचे आश्वासन मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील …
RamPrahar – The Panvel Daily Paper