Breaking News

पनवेलमध्ये ‘खेळ रंगला पैठणीचा’

पनवेल : वार्ताहर

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून, शुक्रवारी (दि. 10)पनवेल येथील फडके नाट्यगृहात खेळ रंगला पैठणीचा या कार्य क्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रिया इव्हेंट्स आणि बीबी बांठिया प्रस्तुत या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रसिद्ध अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर उपस्थित होत्या.

या वेळी वर्षा प्रशांत ठाकूर, ममता म्हात्रे, टुरिझम ग्लोब क्वीन हर्षला तांबोळी, तू चाल पुढं या झी मराठीवरील मालिकेतील अभिनेत्री प्रतिभा गोरेगावकर, माजी नगरसेवक राजू सोनी,  शिवसेना महानगरप्रमुख प्रथमेश सोमण, बीबी बांठिया ज्वेलर्सचे मॅनेजिंग पार्टनर गौरव बांठिया, रितू राजेश डोंगरे, स्पर्श हॉस्पिटलचे प्रतिनिधी स्वप्निल म्हात्रे, द्वारकाधीश साडी सेंटरचे मालक वीरेंद्र जगे, ‘पुण्यनगरी’चे संपादक राजेश खेडेकर, रेड विंगस हॉटेलचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रतिभा सूर्यवंशी, चितळे एक्सप्रेसच्या वतीने भक्ती कर्वे मॅडम, राजश्री सोनी, नाट्यनिर्माते तथा मंदार काणे एंटरटेनमेंटचे सर्वेसर्वा मंदार काणे, माधुरी गोसावी, रमेश आंग्रे, प्रदीप आंग्रे, मधुसूदन साखरे इत्यादी मान्यवरांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

निवेदक हरीश मोकल यांनी निवेदन केले. पैठणीच्या या खेळामध्ये तब्बल 300 पेक्षा जास्त महिलांनी सहभाग घेतला. ज्यामध्ये अंतिम फेरीमध्ये आठ महिलांनी प्रवेश केला होता. सुरशीच्या या खेळामधील शेवटच्या या आठ पैकी अंतिम तीन जणींना अनुक्रमे मीनाक्षी पाटील (पहिली), सुनिता कुडवे (दुसरी) आणि कांचन गडकरी (तिसरी) अशा मानाच्या पैठण्या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्या.

या वेळी नाट्यगृहात उपस्थित महिलांसाठी लकी ड्रॉ ठेवण्यात आला होता. या लकी ड्रॉमध्ये विजेत्या ठरलेल्या पाच महिलांना देखील पारितोषिकांच्या रुपात पाच पैठण्या प्रदान करण्यात आल्या. याशिवाय प्रेक्षक महिलांनासुद्धा उखाण्यांसाठी विशेष भेटवस्तू देण्यात आल्या.

एकूणच कार्यक्रमाचे आयोजक प्रिया इव्हेंट्सचे सर्वेसर्वा रसिक आंग्रे यांच्या माध्यमातून कार्यक्रम सुंदररित्या झाला.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply