पनवेल : रामप्रहर वृत्त
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 10 लाख रुपयांच्या निधीतून पनवेल तालुक्यातील आजिवली येथे अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. या विकासकामाचा शुभारंभ भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले. या वेळी बोलताना त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून विकासाकरीता निधीची कमतरता भासणार नाही, असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमास भाजप तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, माजी पं. स.चे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते आप्पा भागीत, के. सी. पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
Check Also
पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …
RamPrahar – The Panvel Daily Paper