पनवेल : रामप्रहर वृत्त
येथील नक्षत्र फॉर्मिंग ज्वेलरी या दुकानाचे नवीन जागेत स्थलांतर झाले असून या शोरूमचे उद्घाटन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यकारी समिती सदस्य वर्षा प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आणि माजी नगरसेविका दर्शना भोईर यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. 22) झाले.
या वेळी संतोष मेढेकर व कविता मेढेकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. त्याचप्रमाणे रंजीत कदम, दीपक गायकवाड, राजेंद्र माने, महेंद्र शिंदे, राजेश पवार, सुमित शिंदे, राजेंद्र पाटील तसेच संचालक मंडळ व कर्मचारी उपस्थित होते.
नक्षत्र फॉर्मिंग ज्वेलरी एक विश्वासार्ह ब्रँड असून त्यांची 16 वर्षांची उज्ज्वल परंपरा अविरतपणे सुरू आहे. याची पनवेलमध्ये पहिली शाखा सन 2006मध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सुरू झाली. महाराष्ट्रात ‘नक्षत्र’च्या सध्या 11 शाखा असून फॉर्मिंग ज्वेलरीचा स्वतःचा कारखानाही आहे. पनवेल येथील शोरूममध्ये पाच हजारांपेक्षा प्रकारचे दागिने खरेदीसाठी उपलब्ध आहेत. आम्हाला पनवेलकरांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. यापुढेही तो असाच मिळत राहील, अशी अपेक्षा संतोष मेढेकर यांनी या वेळी व्यक्त केली.
Check Also
अमर भूपाळी होनाजी बाळा @७५ वर्षे : एक संगीतमय अजरामर कलाकृती
भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाटचालीतील काही दर्जेदार (क्लासिक) चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात आणि त्यात पुनर्प्रत्ययाचा आनंद …
RamPrahar – The Panvel Daily Paper