महाड : प्रतिनिधी
महाड तालुक्यातील मोहोत गावात शुक्रवारी रात्री क्षुल्लक कारणावरून एकाने गोळीबार केल्याची घटना घडली. यात दोन जण जखमी झाले आहेत. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून बंदूकही हस्तगत केली आहे.
महाड तालुक्यातील मोहोत येथे मंदिर जीर्णोद्धार कार्यक्रम सुरू असताना मागील भांडणाचा राग मनात धरून हा गोळीबार झाल्याचे समजते. या वेळी रोशन राम मोरे याने केलेल्या गोळीबारात सोहम आत्माराम हिरडेकर (वय 23) व संकेश शशिकांत कदम (वय 28) हे दोघे जखमी झालेे असून त्यांना महाड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता पाठवण्यात आले. जखमींपैकी एकाच्या पायाला गंभीर जखम झाल्याने त्याला अधिक उपचाराकरिता मुंबई येथे हलविण्यात आले आहे.
महाड औद्योगिक पोलीस ठाण्याच्या पथकाने आरोपी रोशन मोरे याला अटक करून बंदूक हस्तगत केली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
Check Also
लोकनेते रामशेठ ठाकूर समाजसेवेतील हिरा -आमदार रविशेठ पाटील
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या मूट …
RamPrahar – The Panvel Daily Paper