उरण : प्रतिनिधी
तस्करी करण्यात येत असलेल्या तीन कोटींच्या ई-सिगारेट जेएनपीए बंदरातून जप्त करण्यात आल्या आहेत. सीमा शुल्क विभागाने ही कारवाई केली.
सीमा शुल्क विभागाला गुप्त खबर्याकडून विदेशातून तस्करीच्या मार्गाने पाठविण्यात आलेल्या ई-सिगारेटबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार संशयित कंटेनरची तपासणी केली असता त्यात 45 हजार 886 ई-सिगारेटचा साठा आढळला. पाण्याची बाटली, चुंबकीय बटण, बेल्ट बकल या वस्तूंच्या नावाखाली ई-सिगारेट्स आयात करण्यात आल्या होत्या. त्या सीमा शुल्क विभागाने जप्त केल्या. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
Check Also
25 एकांकिका राज्यस्तरीय अटल करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल
पनवेल : रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य …