Breaking News

आमरसामुळे पनवेल-सायन महामार्ग झाला जाम

पनवेल ः वार्ताहर
पनवेल-सायन महामार्गावर पनवेलहून बेलापूरकडे जाणार्‍या रिक्षेमधील आमरसाने भरलेली अंदाजे पाच ते दहा किलो वजनाची पिशवी रस्त्यावर पडल्याने आमरस रस्त्यावर सांडला. या आमरसामुळे जवळपास पाच ते सहा वाहने घसरल्याने काही काळ पनवेल-सायन महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.
सायन-पनवेल महामार्गावरील कामोठे ब्रिजवर पाच ते सहा वाहने घसरून पडली. हा प्रकार ऑइलच्या गळतीमुळे झाला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता, मात्र रस्त्यावर आमरस सांडल्याचे वाहनचालकांच्या लक्षात आल्यानंतर याबाबत वाहतूक पोलिसांना कळवण्यात आली होती.
या वेळी कळंबोली वाहतूक शाखेच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी दाखल होत सदर ठिकाणी माती टाकून वाहतूक सुरळीत केली होती.

Check Also

पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा

मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न …

Leave a Reply