Breaking News

कळंबोली भाजपचेही योगदान

कळंबोली : प्रतिनिधी

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे सांगली कोल्हापूरमध्ये पुराच्या पाण्याने हाहाकार माजवला. सांगली कोल्हापूर शहर पाण्याखालीच गेल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांची वाताहत झाली आहे. या लोकांना उभारी देताना मदतीचा ओघ सुरू झाला आहे. कळंबोली भाजपाच्या वतीने सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन करण्यात आले होते त्याप्रमाणे या पूरग्रस्तांसाठी तांदूळ, पीठ, तेल, बिस्किटे, साड्या, कपडे, औषध, पाणी, भांडी या जीवनावश्यक वस्तूंचा ट्रक भरून पाठविण्यात आला.

कळंबोली भाजपचे शहर अध्यक्ष रविशेठ पाटील यांनी पूरग्रस्तांना मदतीसाठी आवाहन केले होते. त्यामध्ये पनवेल महानगरपालिका माजी सभापती अमर पाटील, भाजपचे नेते राजेंद्र बनकर, भाजपचे सरचिटणीस  संजय दोडके, श्रीकांत ठाकूर, प्रवीण पाटील, उत्तर भारतीय कळंबोली शहर अध्यक्ष केशव यादव, दीपक बेस्ट, कृष्णा पाटील, महादेव कोळी, खंडेलवाल, यशोदा, सचिन, प्रियंका पवार, मनिषा निकम, दुर्गा साहानी, मयुरी पेरवी आदी कार्यकर्त्यांनी यासाठी खूप प्रयत्न केले.

Check Also

नतनोत्सवाने पनवेलमध्ये रंगला कलेचा सुरेल जल्लोष

नगरसेवक परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तसांस्कृतिक कलेचा वारसा जपणाऱ्या नृत्यार्पण फाईन …

Leave a Reply