लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आज ’जल्लोष सुवर्णयुगाचा’

रविवारी मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

पनवेल ः रामप्रहर वृत्त

महाराष्ट्राचे दानशूर व लाडके व्यक्तिमत्त्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 72व्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी (दि. 2) पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी रामबाग येथे जल्लोष सुवर्णयुगाचा हा मनोरंजनात्मक कार्यक्रम व श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे, तर रविवारी (दि. 4) मोहोपाडा (ता. खालापूर) येथे मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप शिबिराचे आयोजन केले गेले आहे. न्हावेखाडी ग्रामस्थ मंडळ व श्री म्हसेश्वर मंदिर कमिटीच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी 6 ते 8 दरम्यान श्री सत्यनारायणाची महापूजा व महाप्रसाद, तर सायंकाळी 7.30 वाजता स्टेप आर्ट डान्स अकॅडमी प्रस्तुत, पप्पू सूर्यराव निर्मित जल्लोष सुवर्णयुगाचा हा नृत्य आणि हास्य मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये गायक योगेश आग्रावकर, अमोल जाधव, हास्य कलाकार सुशांत पाटील अशा अनेक कलाकारांचा समावेश असणार आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उरण विधानसभा भाजपच्या वतीने मोहोपाडा येथील जनता विद्यालयात रविवारी सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात सामान्य तपासणी, शल्यचिकित्सा, अस्थिरोग, कान, नाक, घसा, नेत्ररोग, दंतचिकित्सा, त्वचारोग, रक्त तपासणी, ईसीजी, विविध आरोग्य तपासणी, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, औषधोपचार तसेच शस्त्रक्रिया सुविधाही उपलब्ध असणार आहे. त्याचबरोबर या वेळी रक्तदान शिबिरसुद्धा आयोजित करण्यात आले असून या शिबिराचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

Check Also

Zimpler Casinos fifty+ Finest Casinos double tigers slot on the internet Taking Zimpler

Articles Double tigers slot: Could there be one support service to contact?: Guide away from …

Leave a Reply