Breaking News

क्रिकेट स्पर्धेत कोप्रोली किंग विजेता

उरण : वार्ताहर

आम्ही पिरकोनकर समूहातर्फे खास चिमुकल्यांसाठी उरण पूर्व विभागात प्रथमच 15 वर्षांखालील क्रिकेटपटूंसाठी मर्यादित षटकांची स्पर्धा रविवारी (दि. 17) आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेस बच्चेकंपनीचा प्रतिसाद लाभला.

या स्पर्धेत परिसरातील 12 संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन पिरकोनचे माजी सरपंच गन्नाथ ठाकूर यांच्या हस्ते झाले. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना या वेळी श्रद्धांजली वाहून सामान्यांना सुरुवात करण्यात आली. खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी पिरकोन गावचे प्रथम नागरिक रमाकांत जोशी, निर्माता शेखर पाटील, सारडे गावचे माधव म्हात्रे, नागेंद्र म्हात्रे, खोपटे गावातील अजित पाटील, प्रांजल पाटील, आवरे गावातील व्यावसायिक निलेश म्हात्रे, भोईर, पाणदिवे गावातील योगेश म्हात्रे, पाले गावातील संदीप गावंड यांनी स्पर्धेस भेट दिली.

स्पर्धेत कोप्रोली किंग्ज संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. द्वितीय क्रमांक सारडे सुपरस्टार्सने पटकावला. तृतीय क्रमांक दिघाटी डेअरडेव्हिल्सने प्राप्त केला.

स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज अंकुर पाटील (कोप्रोली); तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून शुभम पाटील (सारडे) यांची निवड करण्यात आली. विजेते संघ आणि उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या खेळाडूंना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply