पनवेल : रामप्रहर वृत्त
श्री श्री रविशंकर प्रणित आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या वतीने राज्यभर सोमनाथ ज्योतिर्लिंग यात्रा आयोजित करण्यात आली आहे. ही यात्रा 15 जून ते 6 जुलैदरम्यान महाराष्ट्रभर होणार आहे. पनवेलमध्ये हजार वर्षानंतर प्रथमच मूळ ज्योतिर्लिंग दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह रुद्र पूजा आणि दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला होत.
या सोहळ्याला भारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, शकुंतला ठाकूर, वर्षा ठाकूर, अर्चना ठाकूर, मयुरेश नेतकर, भाजपाचे शहराध्यक्ष सुमित झुंजारराव, गव्हाण पंचायत समितीच्या माजी सदस्य रत्नप्रभा घरत, माजी नगरसेवक मदन कोळी, अमरीश मोकल, चिन्मय समय, प्रीतम म्हात्रे, माजी नगरसेविका दर्शना भोईर, स्वाती कोळी यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Check Also
अफवांच्या पिकाला सत्याच्या विचारांनी छेद द्या; सोशल मीडियावर सक्रिय अन् बोलके राहा!
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे कार्यकर्त्यांना आवाहन पनवेल ः रामप्रहर वृत्तआजच्या आधुनिक आणि डिजिटल युगात …
RamPrahar – The Panvel Daily Paper