पनवेल : वार्ताहर
पनवेल जवळील भिंगारी येथील ब्रिजवर एसटीने दिलेल्या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे.
एसटी महामंडळाची बस खेडहून मुंबई येथे जात होती. दुपारी 12 च्या सुमारास एसटी भिंगारी येथील ब्रिज वरून पनवेलच्या दिशेने जात होती. त्यावेळी एक महिला ब्रिजवरून रस्ता ओलांडत असताना या बसची तिला धडक बसली. यामध्ये या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच पनवेल शहर ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच पनवेल वाहतूक शाखेचे अधिकारी व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होत परिस्थितीतच आढावा घेत एसटी चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.
Check Also
तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड
पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …