Breaking News

स्टीव्ह स्मिथमध्ये झाले सचिनचे दर्शन

लंडन : वृत्तसंस्था

30 मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. यासाठी प्रत्येक टीमने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. वर्ल्ड कपआधीच्या सराव सामन्यात स्टीव्ह स्मिथची बॅटिंग बघून सचिन तेंडुलकरची बॅटिंग बघितल्यासारखं वाटलं, असं वक्तव्य ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी केलं आहे.

मागच्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजच्या वेळी बॉल छेडछाड प्रकरणामुळे स्टीव्ह स्मिथवर एक वर्षाची बंदी घालण्यात आली. ही शिक्षा संपल्यानंतर स्मिथ आयपीएलमध्ये खेळताना दिसला. यानंतर इंग्लंडमध्ये पोहोचल्यावर झालेल्या सराव सामन्यात स्मिथने बॉलरची धुलाई केली.पॅट कमिन्सला थर्ड मॅनच्या डोक्यावरून सिक्स मारल्यानंतर स्मिथने नॅथन कुल्टर नाईलवरही हल्ला चढवला. स्मिथची ही बॅटिंग बघणं म्हणजे सचिनला बॅटिंग करताना बघितल्यासारखं होतं, असं लँगर म्हणाले. ‘एक बॅट्समन म्हणून हे चांगलं आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सराव सामन्यान मी स्मिथला बॅटिंग करताना बघितलं. तो या खेळाचा मास्टर आहे. त्याने टीममध्ये चांगलं पुनरागमन केलं आहे,’ अशी प्रतिक्रिया लँगरनी दिली.

Check Also

पनवेलमधील बेघर निवारा प्रकल्पाची महापालिका सदस्यांकडून पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या वतीने सेक्टर १२, प्लॉट क्रमांक २ए येथे उभारण्यात येत असलेल्या …

Leave a Reply