पनवेल ः रामप्रहर वृत्त
आपटा ग्रामपंचायतीच्या शेतकरी कामगार पक्षाच्या सदस्य गीता देशमुख व कार्यकर्ते राजू देशमुख यांनी रविवारी (दि. 13) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. आमदार महेश बालदी यांनी त्यांचे स्वागत केले.
पनवेल मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, सरचिटणीस राजेंद्र पाटील, माजी जि.प. सदस्य ज्ञानेश्वर घरत, केळवणे जि.प. विभागीय अध्यक्ष मंगेश वाकडीकर, आपटा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दत्ता पाटील, तारा येथील भाजपचे कार्यकर्ते जितेंद्र पाटील, गणेश पाटील आदी या कार्यक्रमास उपस्थित होते. या वेळी पक्षप्रवेशकर्त्या देशमुख दाम्पत्याचे आमदार महेश बालदी व अन्य मान्यवरांनी पक्षाची शाल देत भाजपमध्ये स्वागत केले.
Check Also
टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोषची कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात निवड
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन अन् शुभेच्छा पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper