पनवेलमध्ये विभाजन विभिषिका चित्र प्रदर्शन

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त
विभाजन विभिषीका स्मृती दिनानिमित्त भारतीय जनता पक्ष पनवेलच्या वतीने विभाजन विभिषिकासंदर्भात दोन दिवसीय चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून या प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 14) करण्यात आले. या वेळी बोलताना त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी आपले सर्वस्व त्यागले त्यांचे स्मरण सतत होत राहिले पाहिजे, असे प्रतिपादन केले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध कार्यक्रम आणि संकल्प करून साजरा होत आहे. त्या अंतर्गत 14 ऑगस्ट हा दिवस विभाजन विभिषिका स्मृती दिवस म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली साजरा करण्यात येत आहे. फाळणीत विस्थापित झालेल्या आणि प्राण गमावलेल्या लाखो बंधू-भगिनींच्या संघर्ष व बलिदानाच्या स्मरणार्थ या दिनानिमित्त भाजपच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आले आहे. त्यानुसार पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात फाळणीच्या भयंकर स्मरण दिनाची कल्पना नवीन पिढीला मिळावी यासाठी दोन दिवसीय प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी झाले.
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या स्वातंत्र्यवीरांच्या कुटुंबीयांचा या वेळी सत्कार करण्यात आला. तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही सदैव तुमच्यासोबत आहोत, अशी ग्वाही या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली.
या सोहळ्यास भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक प्रकाश बिनेदार, अजय बहिरा, माजी नगरसेविका दर्शना भोईर, राजश्री वावेकर, रूचिता लोंढे, भाजपचे पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, सांस्कृतिक सेल जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि देशप्रेमी नागरिक उपस्थित होते.
या वेळी कै. सदाशिव शांताराम ठाकूर, कै. शांतीलाल चुनिलाल गुगळे, कै. बाबूसिंग उर्फ प्रल्हादसिंग नारायणसिंग ठाकूर, कै. किसनराव एकनाथ जगनाडे, कै. परशुराम महादेव गोडबोले, कै. तुळशीराम बाळकृष्ण हिरवे, कै. शांताराम अच्युत वालावकर, कै. रामकृष्ण गणेश आपटे, कै. मारुती मुकुंद पन्हाळे, कै. मुळशंकर माधव मेहता, कै. शंकर चिंतामण तथा बापूसाहेब खरे, कै. दलिचंद लालचंद कोठारी, कै. दत्तात्रय वामन गोखले, हुतात्मा तुळशीराम बाळकृष्ण हिरवे, कै. दिगंबर गणेश गवाणकर यांच्या कुटुंबीयांचा आमदार प्रशांत ठाकूर व अन्य मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तत्पूर्वी आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील यांच्यासह पदाधिकार्‍यांनी शहरातील हुतात्मा स्मारक उद्यानात जाऊन अभिवादन केले.

Check Also

The member group is always indeed there to aid when needed

Partypoker are an extremely valued spouse for people. And greatest of all – the value …

Leave a Reply