तळोजा : रामप्रहर वृत्त
तळोजा एमआयडीसीतील न्यू केमिकल झोनमधील रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि. 5) झाले.
एमआयडीसीच्या माध्यमातून 200 कोटी रुपये खर्चून साडेवीस किलोमीटरच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाला. या वेळी तळोजा उपविभाग सहाय्यक अभियंता सुभाष कुंभार, औदुंबर अलाट, कनिष्ठ अभियंता जयेश जाधव, योगेश शेवाळे, अविनाश शर्मा, अमोघ ठाकूर आदी उपस्थित होते.
Check Also
महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आमूलाग्र बदलांचे संकेत
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश! संपूर्ण महाराष्ट्रातील रुग्णांना होणार फायदा मुंबई : रामप्रहर …
RamPrahar – The Panvel Daily Paper