पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 19 येथील कृष्णाळे तलाव परिसरात स्ट्रीट पोल उभारण्यात आले आहेत. या कामाचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि.8) लोकार्पण झाले.
पनवेल महापालिका हद्दीत आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे विविध विकासाची कामे मार्गी लागून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यांच्या पाठपुराव्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील कृष्णाळे तलाव परिसरात आठ लाख 45 हजार 105 रुपयांचा निधी खर्च करून स्ट्रीट पोल उभारण्यात आले आहेत. या कामाचे लोकार्पण माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमास भाजपचे शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी नगरसेवक राजू सोनी, अजय बहिरा, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, शहर खजिनदार संजय जैन, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, सरचिटणीस चिन्मय समेळ, शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव, प्रभाग क्रमांक 19चे अध्यक्ष पवन सोनी यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.
Check Also
गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा
उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …
RamPrahar – The Panvel Daily Paper