Breaking News

घेता घेता एक दिवस…देणार्याचे हात घेणारी श्रद्धा

पनवेल : प्रतिनिधी – आपल्याला मिळालेली मदत पाहून तिचे डोळे पाणावले पण आपली गरज पूर्ण झाल्यावर घेता घेता एक दिवस…देणार्‍याचे हात घ्यावेत असे म्हणतात. आपली गरज पूर्ण झाल्यावर दुसर्‍याला मदत करण्याचा विचार करून श्रध्दा पटेल हिने आतापर्यंत 200 पेक्षा जास्त गरीबांना स्वत: मास्क शिवून मोफत दिले. 

पनवेलमध्ये एका मोठ्या सोसायटीतील टू बीएचकेमध्ये राहणारे सहा माणसांचे कुटुंब. घरात नऊ वर्षाच्या छोट्यापासून 90 वर्षाच्या पणजी पर्यंतची सहा माणसे कर्ता पुरुष नाही. ती, तिची दोन लहान मुले, सासू सासरे आणि 90 वर्षाची आजेसासू. ती खाजगी स्कूलमध्ये नोकरी करून घर चालवते. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे पगार नाही. घरात खायला काहीच नाही. मोठ्या सोसायटीत राहत असल्याने मदत कोण देणार आणि मागायची तरी  कशी असा प्रश्न तिच्यापुढे पडलेला. आपल्या एका सहकारी मैत्रिणीला परिस्थिती सांगितल्यावर पत्रकारामार्फत तिला नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ व सामाजिक संस्थेकडून मदत मिळाली त्यावेळी तिचे डोळे पाणावले.

आपल्याला मदत मिळाल्यावर आपण सुध्दा कोणाला तरी  मदत केली पाहिजे, असे तिला वाटू लागले. आपल्या सोसायटीच्या बाहेर बसणारे भाजीवाले, फळ विक्रेते आणि छोटे फेरीवाले आपला धंदा करीत असताना मास्क वापरत नसल्याचे तिच्या लक्षात आले. त्यांना विचारल्यावर मास्कची किंमत (त्यावेळी 80 ते 100 रुपये) जास्त असल्याने घ्यायला परवडत नसल्याचे समजले. तिच्याकडे शिलाई मशीन होते. मग आपण यांना मास्क शिऊन दिले तर असा विचार मनात आला. घरात कॉटनचे ड्रेस मटेरियल होते त्यापासून मास्क बनवून या छोट्या विक्रेत्यांना दिले.

सोसायटीतील शिक्षक असलेल्या सुषमा गुप्ता यांनी आपण सगळ्यांनी मिळून असे मास्क बनवून वाटले तर असा विचार बोलून दाखवल्यावर महिलांचा ग्रुप तयार झाला प्रत्येकीने एक एक जबाबदारी घेतली कोणी कापड दिले, कोणी दोरा व इतर साहित्य दिले. श्रध्दा पटेल यांनी आत्तापर्यंत दोन-अडीचशे मास्क फावल्या वेळात घरी बनवले आहेत आणि अजून बनवित आहेत. हे मास्क त्या विविध सामाजिक सेवाभावी संस्था, रुग्णालये, तसेच मोलमजुरी करणार्‍या मजुरांना मोफत वाटतात .   

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply