उरण ः रामप्रहर वृत्त
उरणच्या चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील डाऊरनगर येथील साई मंदिराच्या सभामंडपाचे लोकार्पण आमदार महेश बालदी यांच्या हस्ते रविवारी (दि. 25) करण्यात आले. त्याचप्रमाणे डाऊरनगर, चारफाटा येथे नवीन समाजमंदिर बांधण्यात येत असून या कामाचे भूमिपूजनही आमदारमहोदयांच्या हस्ते झाले.
आमदार महेश बालदी यांच्या विकासनिधीतून सभामंडपासाठी 40 लाख रुपयांचा निधी देण्यात आला होता, तर समाजमंदिरासाठी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या कार्यक्रमांना आमदार महेश बालदी यांच्यासोबत भाजपचे उरण तालुका अध्यक्ष रविशेठ भोईर, चाणजे विभाग अध्यक्ष जितेंद्र घरत, तालुका सरचिटणीस कैलास भोईर, माजी नगरसेवक राजू ठाकूर, उद्योजक प्रकाश ठाकूर, प्रसाद भोईर, प्रशांत माळी, संतोष पाटील आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
Check Also
‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम
दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …
RamPrahar – The Panvel Daily Paper