Breaking News

महायुतीचे उमेदवार व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर सोमवारी दाखल करणार अर्ज

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल विधानसभा मतदारसंघातून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय व मित्रपक्ष युतीचे उमेदवार व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर हे सोमवारी (दि. 28) आपला अर्ज निवडणूक अधिकारी यांच्याकडे दाखल करणार आहेत.
सलग तीनवेळा बहुमताने विजय मिळवत विरोधकांना धोबीपछाड देणारे कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर हे मताधिक्य मिळवून विजयाचा चौकार मारण्यासाठी ज्येष्ठ, युवा, महिला, कार्यकर्ते व मतदारराजाच्या आशीर्वादाने सज्ज झाले आहेत. सोमवारी सकाळी 9 वाजता पनवेल येथील भाजप मध्यवर्ती कार्यालयात पदाधिकारी, कार्यकर्ते, आणि हितचिंतक जमणार असून त्यानंतर महायुतीतील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत रॅलीद्वारे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्त्व देणारे आणि जनतेने टाकलेला विश्वास सार्थ करणारे लोकप्रतिनिधी म्हणून लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे पाहिले जाते. पनवेल मतदारसंघाचे सक्षम लोकप्रतिनिधी म्हणून संपूर्ण जबाबदारीने ते कार्यरत आहेत. प्रगतीपासून दूर आणि भकास झालेल्या पनवेलला विकासाचा चेहरा देण्याचे काम त्यांनी केले व खर्‍या अर्थाने विधायक कार्याने पनवेलला नवी ओळख करून दिली.
कार्यक्षम आमदार प्रशांत ठाकूर यांच्या दूरदृष्टीतून पनवेल विधानसभा क्षेत्रात विकासाचे महापर्व आले. सर्वधर्मसमभाव आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम त्यांच्याकडून कायम पहायला मिळते. आपल्या कार्यकौशल्यातून पनवेलचा विकास घडविणारे, वक्तृत्व, दातृत्व व नेतृत्व गुणसंपन्न लोकप्रतिनिधी आणि समाजप्रिय व्यक्तीमत्व म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांचा नेहमीच नागरिकांना अभिमान राहिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना जनतेचा कौल मिळणार असून सोमवारी ते तमाम जनतेच्या साक्षीने उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply