Breaking News

उरणमधील ‘उबाठा’, शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत

उरण : रामप्रहर वृत्त
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाला जोरदार धक्का बसला आहे. या पक्षांच्या उरणमधील पदाधिकारी, उपसरपंच आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या सर्वांचे आमदार महेश बालदी यांनी पक्षात स्वागत केले.
युवासेना तालुका अध्यक्ष हितेश विश्वनाथ पाटील यांनी ‘उबाठा’ला अखेरचा जय महाराष्ट्र केला. त्याचप्रमाणे कोप्रोलीचे उपसरपंच अनंता दत्तात्रेय कोळी, गितेश धनंजय म्हात्रे, शेकापचे कार्यकर्ते मिलिंद पांडुरंग म्हात्रे, मिलिंद निळकंठ म्हात्रे यांनी शेकापला राम राम करत आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या विकासकामांवर प्रभावित होऊन भाजपमध्ये प्रवेश केला. या सर्वांचे स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमास भाजपचे उरण तालुका अध्यक्ष रविशेठ भोईर, कामगार नेते जितेंद्र घरत, पूर्व विभाग अध्यक्ष शशी पाटील, माजी जि.प. सदस्य विजय भोईर तसेच देवेंद्र पाटील, दत्ता म्हात्रे, गिरीश म्हात्रे, कोप्रोली शाखा अध्यक्ष सचिन गावंड, कल्पेश म्हात्रे, अश्विन म्हात्रे, सुदेश पाटील, कार्याध्यक्ष निलेश पाटील, अलंकार म्हात्रे, निखिल म्हात्रे यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

भाजपकडून महिला सक्षमीकरणासाठी बळ दिले जाते -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष नेहमीच महिलांना शक्ती देण्याचे आणि त्यांना सक्षम करण्याचे काम …

Leave a Reply