Breaking News

कामोठ्यातील निर्भय फोरमचीही साथ

गेल्या पाच वर्षापासून कामोठ्यामध्ये कार्यरत असलेल्या निर्भय फोरमने महायुतीचे उमेदवार व कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांना निवडणुकीसाठी आपला पाठिंबा दिला आहे.
कामोठ्यात झालेल्या बैठकीमध्ये निर्भय फोरमच्या पदाधिकार्‍यांनी याबाबत घोषणा केली. आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचे काम महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी त्यांना फोरमने हा पाठिंबा जाहीर केला. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड. प्रकाश बिनेदार, उपाध्यक्ष के.के. म्हात्रे यांच्यासह फोरमचे पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply