Breaking News

शेतकर्यांना हेक्टरी 25 हजारांची तत्काळ मदत द्यावी, देवेंद्र फडणवीस यांची मागणी

मुंबई ः प्रतिनिधी

अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना तातडीने हेक्टरी 25 हजार रुपयांची मदत देण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (दि. 1)

विधानसभेत केली.विधानसभेचे तीन दिवसीय अधिवेशन बोलावण्यात आले होते. या अधिवेशनादरम्यान माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्‍यांचा प्रश्न उपस्थित केला होता. विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही नियम 57ची नोटीस दिली आहे. अध्यक्षांची घोषणा करायची बाकी आहे,  पण नियम 57ची सूचनाही महत्त्वाची आहे. त्यामुळे योग्य वेळी आम्हाला ती मांडण्याची अनुमती द्यावी. राज्यात जो अवकाळी पाऊस झाला. त्यात शेतकर्‍यांचे, मासेमारी करणार्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यांना तत्काळ 25 हजार रुपये हेक्टरी मदत देण्यात यावी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः तशी मागणी केली होती. ती आता त्यांनी त्वरेने पूर्ण करावी आणि बळीराजाला दिलासा द्यावा, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

Check Also

रोटरी क्लबच्या पैठणी महोत्सवाचे उद्घाटन

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने …

Leave a Reply