पनवेलमध्ये गुरुवारी ’संदीप वैभव…आणि कविता’

कुसुमाग्रज जयंती व मराठी राजभाषा गौरव दिननिमित्त कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त
ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची जयंती आणि त्याला अनुसरून साजर्‍या होणार्‍या मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त भारतीय जनता पक्ष उत्तर रायगड सांस्कृतिक सेलच्या वतीने लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ’संदीप वैभव… आणि कविता’ ही वैभव जोशी आणि संदीप खरे यांच्या स्वरचित कवितांची नित्य नवी मैफिल आयोजित करण्यात आली आहे. गुरुवारी (दि.27) सायंकाळी 7.30 वाजता पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ही मैफल सादर होईल.
1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, आणि मराठी भाषेला राज्याच्या अधिकृत भाषेचा दर्जा मिळाला. त्यामुळे 1 मे हा ’मराठी राजभाषा दिन’ किंवा ’मराठी भाषा दिन’ म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर 27 फेब्रुवारी हा ’मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. हा दिवस ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने मराठी भाषेच्या गौरवासाठी समर्पित आहे. 1 मे हा मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाल्याचा दिवस, तर 27 फेब्रुवारी हा मराठी भाषेच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक योगदानाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो, ज्याद्वारे मराठी भाषेचे संवर्धन आणि प्रसार केला जातो.
’संदीप वैभव…आणि कविता’ हा एक लोकप्रिय मराठी काव्य कार्यक्रम आहे, ज्यामध्ये प्रसिद्ध कवी संदीप खरे आणि वैभव जोशी आपल्या कवितांचे सादरीकरण करून विविध कवितांद्वारे श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतात. त्यामुळे या कार्यक्रमाचे अनन्यसाधारण महत्व असून रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी वैभव बुवा (9029410699) किंवा अभिषेक पटवर्धन (8668332159) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Check Also

The member group is always indeed there to aid when needed

Partypoker are an extremely valued spouse for people. And greatest of all – the value …

Leave a Reply