उरण ः प्रतिनिधी
महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीचे औचित्य साधून पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगडभूषण डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत रविवारी (दि. 2) उरण शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात आमदार महेश बालदी यांनी सहभाग घेतला.
या वेळी उरण तहसील कार्यालय, पोलीस ठाणे, ग्रामीण रुग्णालय, न्यायालय, आयटीआय तसेच सर्व शासकीय कार्यालये, मैदाने व प्रमुख रस्त्यांच्या ठिकाणी मोहीम राबवून स्वच्छता करण्यात आली. श्री सदस्यांनी हातात झाडू, घमेले व फावडे घेऊन परिसर स्वच्छ केला. सकाळी 8 ते 12 या वेळेमध्ये 1714 श्री सदस्यांनी एकूण 15.790 टन ओला कचरा, तर 25.434 टन इतका सुका कचरा जमा केला. विशेष म्हणजे उन्हाची तमा न बाळगता उरण शहर स्वच्छ करण्यासाठी हात पुढे सरसावत होते. या वेळी श्री सदस्यांच्या चेहर्यावर एक प्रकारचे समाधान दिसून आले. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि श्री सदस्यांच्या या अभियानाचे आमदार महेश बालदी यांनी कौतुक केले.
Check Also
चित्रपट स्टूडिओतील मिनी थिएटर्स… एक वेगळं विश्व
आज मी जेव्हा परेल येथील राजकमल कला मंदिर स्टुडिओत जातो, तेव्हा अनेक गोष्टीसह तेथील मिनी …
RamPrahar – The Panvel Daily Paper