पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल शहरातील कल्पतरु सोसायटीमध्ये डॉक्टर के.सी डायग्नॉस्टीकच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचे आयोजन रविवारी (दि.23) करण्यात आले होते. या शिबिराला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट दिली.
या वेळी परेश ठाकूर यांनी आरोग्य तपासणी केली तसेच कोरोना काळानंतर नागरीक आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अधीक सतर्क झाले असून या शिबिराचा फायदा नागरीकांना नक्कीच होणार आहेत. त्यामुळे पुढील काळातही अशा प्रकारच्या शिबिरांचे आयोजन व्हावे असे सांगतिले. डॉक्टर के.सी.डॉयग्नॉस्टीकच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सर्व रोग निदान शिबिराला कल्पतरू सोसायटीमधील नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या वेळी माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, संजय भगत, चेअरमन प्रशांत ठाकूर, भार्गव ठाकूर यांच्यासह पदाधिकारी आणि साोसायटीमधील नागरीक उपस्थित होते.
Check Also
‘नेहले पे देहला’ @ ५० वर्षे; पडद्यामागच्या गोष्टी जास्त रंजक
सुनील दत्तच्या वांद्य्रातील पाली हिलवरील अजंठा बंगल्यातील तळघरात असलेल्या मिनी थिएटरमध्ये एखादा चित्रपट अथवा गाणी …
RamPrahar – The Panvel Daily Paper