Breaking News

महिलांसाठी आई एकविरा दर्शन सहल

पनवेल : रामप्रहर वृत्त
आई एकविरा दर्शन या महिलांसाठी एकदिवसीय मोफत सहलीचे आयोजन भाजपचे पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. या सहलीचा शुभारंभ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि.23) झाला. त्यांनी महिलांना शुभेच्छा देत केदार भगत यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले.
भाजपचे पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत आणि केदार भगत मित्र परिवाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी नगरसेविका दर्शना भोईर, पत्रकार विशाल सावंत, शिवसेना शहर संघटक अभिजित साखरे, सुमित दसवते, ब्रिजेश बहिरा, हर्षद गडगे, सचिन भगत, जयेश भगत, संकेत दसवते, यज्ञेश पाटील, शेषनाथ गायकर, अनिकेत सावंत, विशाल सावंत, सचिन जाचक, संतोश वर्तले, कुमार भगत, अनिल भगत, प्रमोद भगत, नितेश भगत, नितीन पाटील, संतोष कथोरे, गीतांजली भगत, निकिता पाटील, सायली भगत,्र अनिता गायकर, सिमिन साळवी, अवंती गडगे आदी उपस्थित होते.

Check Also

खारघरमध्ये गुरू तेग बहादुर यांच्या शहिदी समागमाला प्रारंभ; विविध कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ‘हिंद दी …

Leave a Reply