Breaking News

थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांच्या पुण्यतिथीनिमित्तच्या कार्यक्रमासाठी शुक्रवारी नियोजन बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्त
कष्टकर्‍यांचे द्रष्ट नेते थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या 37 व्या पुण्यतिथी निमित्ताने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणार्‍या कार्यक्रमाच्या नियोजन संदर्भातील बैठक शुक्रवारी (दि.25) सकाळी 11 वाजता उलवे नोड येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
जनार्दन भगत साहेबांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील कार्य अफाट राहिले आहे. त्यांनी अहोरात्र जनतेची सेवा केली. फक्त राजकारण नाही तर सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. आयुष्यापेक्षा ध्येय्य मोठे असले पाहिजे, ही शिकवण त्यांनी समाजामध्ये रुजवली. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त यंदाही सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने उलवे नोडमधील सेक्टर 12 येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये ही बैठक होणार असून नियोजन समितीमधील पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी केले आहे.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply