पनवेल ः रामप्रहर वृत्त
कष्टकर्यांचे द्रष्टे नेते, थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या 37व्या पुण्यतिथी निमित्ताने लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत पनवेल तालुकास्तरीय स्व. जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धा 2025 स्पर्धा तसेच मराठी पाऊल पडते पुढे या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांची नियोजन बैठक लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. 25) उलवे नोडमध्ये झाली.
रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये झालेल्या या बैठकीस जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सचिव परेश ठाकूर, खजिनदार भाऊशेठ पाटील, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव डॉ. एस.टी. गडदे, माजी पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, वसंतशेठ पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, अमित जाधव, नेरे मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव, प्रकाश भगत, संजय भगत, भार्गव ठाकूर, विजय घरत, अमोघ ठाकूर, स्वप्नील ठाकूर, जयवंत देशमुख, वामन म्हात्रे, अनंता ठाकूर, सुधीर ठाकूर, अॅड. राहुल घरत, अशोक कडू, प्रशांत कोळी, सी. एल. ठाकूर, सुहास भगत, दयानंद घरत, रवींद्र भोईर, संतोष भगत, कमलाकर देशमुख, रघुनाथ देशमुख, पंढरीनाथ ठाकूर, महादेव कोळी, किशोर पाटील, अभिषेक पटवर्धन, चिन्मय समेळ, गणेश जगताप यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.
जनार्दन भगतसाहेबांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील कार्य अफाट राहिले असून त्यांनी अहोरात्र लोकांची सेवा केली. आयुष्यापेक्षा ध्येय मोठे असले पाहिजे ही शिकवण त्यांनी समाजामध्ये रूजवत फक्त राजकारण नाही, तर सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. त्याचबरोबर देवदूताची भूमिकासुद्धा बजावत त्यांनी समाजाला न्याय दिला आहे. त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावाने स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार या वर्षीही देण्यात येणार आहे. त्यानुसार तालुक्यातील ग्रामपंचायतींचे स्वच्छतेच्या निकषावर सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकास एक लाख रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकाला 50 हजार रुपये व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांकाला 25 हजार रुपये व सन्मानचिन्ह तसेच दोन उत्तेजनार्थ ग्रामपंचायतींना प्रत्येकी 11 हजार रुपये व सन्मानचिन्ह देऊन 7 मे रोजी उलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदान येथे होणार्या पुण्यतिथी कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
याचबरोबर देवकी मीडिया प्रस्तुत व कलारंजना मुंबई निर्मित उदय साटम संकल्पित व दिग्दर्शित मराठी पाऊल पडते पुढे हा 101 कलावंताचा संच असलेल्या कार्यक्रमाचा 4600वा प्रयोग सादर होणार आहे. त्या अनुषंगाने या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमाचा नियोजन आढावा घेण्यात आला.
Check Also
नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर
उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper