पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या कोशिश फाऊंडेशन आणि पनवेल महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आमदार प्रशांत ठाकूर चषक 2025 वक्तृत्व स्पर्धेच्या वर्ग अंतर्गत फेर्या स्पर्धा प्रमुख मयुरेश नेतकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या खारघर, कोपरा, मुर्बी शाळांमध्ये झाल्या.
या वेळी भाजपचे खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील, जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, माजी नगरसेवक अभिमन्यू पाटील, नरेश ठाकूर, गुरुनाथ गायकर, अनिता पाटील, नेत्रा पाटील, आरती नवघरे, वासुदेव पाटील, शहर सरचिटणीस दीपक शिंदे, समीर कदम, जिल्हा महिला मोर्चा सरचिटणीस संध्या शारबिद्रे, दत्ता ठाकूर, किर्ती नवघरे, अमर उपाध्याय, महिला मोर्चा शहराध्यक्ष साधना पवार, फुलाजी ठाकूर, युवा मोर्चा शहराध्यक्ष नितेश पाटील, अक्षय लोखंडे, प्रवीण बेरा, आदित्य हातगे, हार्दिक पटेल, प्रथम पाटील, सार्थक दोरुगडे, मयूर घरत, योगेश पाटील, राहुल शिंदे, अनिकेत पाटील, ध्रुव गजरा, दिपक ठाकूर, वनिता शिर्के, स्नेहल सावंत, सुनील बाटगेरी आदी उपस्थित होते.
या स्पर्धेत इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आत्मविश्वासाने भाषणे सादर केली. माझं शाळा, माझं स्वप्न, शिक्षणाचं महत्त्व, स्वच्छ भारत यांसारख्या विषयांवर विद्यार्थ्यांनी
स्वतःचे विचार प्रभावीपणे मांडले. स्पर्धेद्वारे विद्यार्थ्यांमध्ये प्रेझेंटेशन स्किल्स, संवाद कौशल्य, आणि व्यासपीठावर आत्मविश्वासाने बोलण्याची क्षमता विकसित होत आहे. ग्रामीण भागातील व शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी अशा स्पर्धा म्हणजे स्वतःला व्यक्त करण्याची अमूल्य संधी ठरते. मुख्याध्यापकांनीही स्पर्धा शाळेच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने उपयुक्त ठरत असल्याचे सांगितले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत तयारीस विशेष वेळ दिला.
कोशिश फाउंडेशनच्या पुढाकाराने व पनवेल मनपाच्या सहकार्याने शासकीय शाळांमध्येही अशा उपक्रमांची रचना होणे ही शिक्षण क्षेत्रासाठी एक सकारात्मक पायरी आहे. स्पर्धा विद्यार्थ्यांच्या नेतृत्वगुणांना चालना देणारी ठरत आहे. पुढील आंतरशालेय फेरीसाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार असून विजेत्यांना पुढील टप्प्यांत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
वक्तृत्व स्पर्धा म्हणजे विचार मांडण्याची, आत्मविश्वास वाढवण्याची संधी असून व्यासपीठावर बोलताना भीती कमी होते. भाषा कौशल्य, मुद्देसूद विचार मांडणे, योग्य शब्द निवडणे शिकायला मिळते. इतर स्पर्धकांचे भाषण ऐकून नवीन दृष्टिकोन समजतात. वक्तृत्वामुळे सामाजिक भान निर्माण होते. त्यामुळे ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या कौशल्यात भर टाकणारी आहे.
-प्रवीण पाटील, अध्यक्ष, -भाजप खारघर मंडळ
RamPrahar – The Panvel Daily Paper