Breaking News

नगरसेवक अमर पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

पनवेल ः प्रतिनिधी

पनवेल महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती तथा नगरसेवक अमर पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. सध्याच्या परिस्थितीत कोरोनासारख्या महामारीपासून बचावासाठी विविध उपाययोजना करणार्‍या वस्तूंचे वाटप आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक अमर पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त करीत सामाजिक बांधिलकी जपली आहे.

मंगळवारी त्यांच्या वाढदिवसानिमित्त कळंबोली येथील प्रभाग समिती ‘ब’च्या कार्यालयाजवळ महापालिकेच्या स्वच्छता कर्मचार्‍यांना फेस मास्कचे वाटप भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, नगरसेविका प्रमिला पाटील, कळंबोली शहर अध्यक्ष रविशेठ पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply