Breaking News

लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरांचे आयोजन

पनवेल : रामप्रहर वृत्त
राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी (दि. 22) पनवेल परिसरात विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
पनवेल उत्तर मंडळाचे रक्तदान शिबिर रामशेठ ठाकूर महाविद्यालय, सेक्टर 3, पेठगाव येथे; खारघर शहर मंडळ शिबिर रामशेठ ठाकूर स्कूल, सेक्टर 19, खारघर येथे; कामोठे शहर मंडळ शिबिर आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालय सेक्टर 36, कामोठे येथे; कळंबोली शहर मंडळ शिबिर आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालय सेक्टर 8 कामोठे येथे; पनवेल शहर मंडळ शिबिर भाजप मध्यवर्ती कार्यालय पनवेल येथे; नवीन पनवेल मंडळाचे शिबिर रोटरी ब्लड बँक खांदा कॉलनी; तर पनवेल पूर्व मंडळाचे शिबिर सेंट अँड्र्यू स्कूल आकुर्ली येथे होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध विधायक उपक्रम राबवले जात आहेत. यामध्ये वृक्षारोपण, दिव्यांग बांधवांना मदत, विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप यांसारख्या अनेक उपक्रमांचा समावेश आहे. पनवेलमध्ये रक्त संकलन करण्याचा उद्देश ठेवून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात अधिकाधिक रक्तदात्यांनी सहभाग घेऊन हा सामाजिक उपक्रम यशस्वी करावे, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर, भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी केले आहे.

Check Also

नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात …

Leave a Reply