पनवेल : रामप्रहर वृत्त
प्रत्येक काम हे जिद्द आणि धाडसाने केले तर अशक्य असे काहीच नाही हे कांडपिळे कुटूंबाने दाखवून दिले आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नढाळ येथे अशोक लेलँडच्या वर्कशॉपच्या उद्घाटनावेळी केले.
जुन्या मुंबई पुणे हायवेवरील नढाळ येथे नव्याने अशोक लेलँड वाहनांचे आक्स फ्लीटवर्क हे वर्कशॉप सुरू करण्यात आले आहे. अनुप कांडपीळे यांनी सुरु केल्या या वर्कशॉपचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि.28) झाले. या वेळी त्यांनी कांडपीळे कुटूंबीयांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे यांनी ही शुभेच्छा दिल्या तसेच अनुप कांडपीळे यांनी आपल्या शिक्षणाचा शिक्षणाचा वापर पुरेपुर केला असून ते व्यवसायात नफी यशस्वी होतील असा विश्वास व्यक्त केला.
या कार्यक्रमावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते वाय.टी.देशमुख, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक अजय कांडपीळे, तेजस कांडपीळे, मनोहर कांडपिळे, वैभव देशमुख, गौरव कांडपीळे, अविनाश शिंदे, अनुप कांडपीळे यांच्यासह अशोक लेलँडचे अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
Check Also
राज्यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या पनवेल महापालिकेला प्रशस्तीपत्र प्रदान
पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 150 दिवसांच्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper