पनवेल ः रामप्रहर वृत्त
जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत शिकणारा राम ठाकूर जर रामशेठ ठाकूर होत असेल, लोकसभेला निवडून येऊन खासदार होत असेल, तर आताची पिढी आमच्यापेक्षाही जास्त हुशार आहे. त्यामुळे ते आमच्याहून अधिक प्रगती करून दाखवू शकतात, असे प्रतिपादन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी खारघर येथे केले.
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा 14वा इन्वेस्टिचर समारंभ आणि सांस्कृतिक महोत्सव गुरुवारी (दि. 7) उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भूषविले. तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते. त्या वेळी ते मार्गदर्शन करीत होते.
कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख, शकुंतला ठाकूर, पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, संस्थेचे सचिव डॉ. एस.टी गडदे, भाजप खारघर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील, जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, प्रभाकर जोशी, माजी नगरसेवक अभिमन्यू पाटील, नरेश ठाकूर, माजी नगरसेविका हर्षदा उपाध्याय, वर्षा ठाकूर, अर्चना ठाकूर, स्वप्नील ठाकूर, राहुल घरत, मुख्याध्यापिका राज अलोनी, अमोघ ठाकूर, आदेश ठाकूर यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला, तर त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना कौन्सिल मेंबर्सची पदे बहाल करण्यात आली. दहावी व बारावीच्या परीक्षेत सर्वोत्तम यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना रोख पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यामध्ये भरत नाट्यम, मल्हार वारी, नटरंग उभा, टॉलीवूड मसाला, पंजाब फ्युजन, देसी धमाका यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांच्या अदाकारीने
उपस्थितांची मने जिंकली.
Check Also
कोकणातील वणव्यांबाबत आमदार प्रशांत ठाकूर आक्रमक
कठोर उपाययोजना करणार -वनमंत्री गणेश नाईक पनवेल : रामप्रहर वृत्तकोकणातील आंबा व काजू बागांचे वणव्यांमुळे …
RamPrahar – The Panvel Daily Paper