चौक, रसायनी : प्रतिनिधी
माझी आर्थिक परिस्थिती चांगली होती. तरीही वडिलांनी मला जिल्हा परिषद शाळेत दाखल केले. त्याचे कारण जिल्हा परिषदेच्या शाळेत संस्कार मिळतात. या परिसरातील जि.प. शाळांना निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन आमदार महेश बालदी यांनी शुक्रवारी (दि. 8) दिले.
भाजपचे नेते व मोहोपाडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कृष्णा पारंगे यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रम आयोजित करून साजरा करण्यात आला. यानिमित्ताने मोहोपाडा येथील जि.प. शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे, माजी जि.प. सदस्य मोतीराम ठोंबरे, वासांबे विभागीय अध्यक्ष सचिन तांडेल, माजी सभापती कांचन पारंगे, जगदीश पवार, दत्ता जांभळे, ग्रामपंचायत सदस्य आकाश जुईकर, रसिका खराडे, दीपक कांबळी, अरुण गायकवाड, अनिल पिंगळे, सद्गुणा पाटील, अमित शहा, माजी सरपंच रोशन राऊत, भाजप शहर प्रमुख चेतन जाधव यांच्यासह सर्वपक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप करून शाळेचे उपकार फेडण्याचे कार्य कृष्णा पारंगे यांनी केले. यातून त्यांच्या समाजाप्रती असलेल्या भावना दिसल्या, असे गौरवोद्गार आमदार महेश बालदी यांनी काढले. या वेळी 799 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
Check Also
पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …
RamPrahar – The Panvel Daily Paper