Breaking News

पनवेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावरील चित्रपटाचा मोफत शो

आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती

पनवेल ः रामप्रहर वृत्त
गेल्या 11 वर्षांपासून देशाच्या सर्वोच्च पदावर असूनही कर्मयोगी या भावनेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करत आहेत. त्यांचे व्यक्तिमत्व कसे घडले हे ‘चलो जीते है’ या चित्रपटाच्या माध्यमातून पहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा चित्रपट पहावा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजप पनवेल शहरच्या वतीने चलो जीते है या चित्रपटाचा मोफत शो आयोजित करण्यात आला आहे. ओरियन मॉलच्या पीव्हीआर स्क्रीनवर 17 सप्टेंबरपासून पुढील सहा दिवस हा चित्रपट रोज सायंकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी दाखवला जाणार आहे. या चित्रपटाच्या पहिल्या शोसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्या वेळी ते बोलत होते. या उपक्रमाचे संयोजन शहर उपाध्यक्ष केदार भगत यांनी केले आहे.
या वेळी भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल शहराध्यक्ष सुमित झुंझारराव, नवीन पनवेल मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे, पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, कामोठे मंडळाचे माजी अध्यक्ष रवी जोशी, माजी नगरसेवक अजय बहिरा, मुकीद काझी, प्रभाकर बहिरा, माजी नगरसेविका रूचिता लोंढे, दर्शना भोईर, प्रीती जॉर्ज, सारिका भगत, सुरेखा मोहोकर, नीता माळी, सरचिटणीस रूपेश नागवेकर, उपाध्यक्ष प्रीतम म्हात्रे, प्रभाग 19 अध्यक्ष पवन सोनी, रामेश्वर आंग्रे, हिमेश बहिरा, युवानेते प्रतीक बहिरा, सुमित दसवते, संतोष वर्तले, भावेश शिंदे, ब्रिजेश बहिरा, संजीवनी खिलारे यांच्यासह पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
या मोफत शोचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी सायंकाळी 6.30 वाजता ओरियन मॉलमध्ये उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply