पनवेल : रामप्रहर वृत्त
भारत विकास परिषद मुंबई कोकण प्रांत अंतर्गत पनवेल विभागाच्या वतीने खांदा कॉलनीत भारत को जानो या ज्ञानस्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाच्या निमित्ताने भारताचा गौरवशाली इतिहास, संस्कृती, परंपरा जपणारे विविध माहितीपूर्ण स्टॉल्स आणि प्रदर्शन भरविण्यात आले.
या प्रेरणादायी उपक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, सतीश मोरे, प्रसिद्ध फिल्म निर्माते महेश शर्मा, भारत विकास परिषदेचे मुंबई कोकण प्रांताचे अध्यक्ष अविनाश धर्माधिकारी, सेक्रेटरी सीमंत प्रधान, पनवेल विभागाध्यक्ष सुबोध भिडे आदी मान्यवर उपस्थित होते.
भारत विकास परिषदेच्या या उपक्रमास तसेच भावी वाटचालीस मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. या उपक्रमामुळे युवकांमध्ये भारताविषयी आत्मभान निर्माण होऊन राष्ट्रभक्तीची भावना अधिक बळकट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Check Also
लगान @२५ वर्षे; क्लासिक चित्रपट, ऑस्करला नामांकन…
काळ १८९३चा. म्हणजे आपल्या अखंड हिन्दुस्थानचा. दीडशे वर्षांपूर्वीचा…स्थळ आपल्या देशातील मध्य भागातील चंपानेर हे अतिशय …
RamPrahar – The Panvel Daily Paper