Breaking News

पनवेल येथे खो-खो स्पर्धा

आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून खेळाडूंना शुभेच्छा

पनवेल ः रामप्रहर वृत्त
राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी आणि पनवेल महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने खो-खो स्पर्धा 14, 17, 19 वर्षे मुला-मुलींच्या गटासाठी पनवेल तालुका क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आली होती.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले आमदार प्रशांत ठाकूर यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
आपल्या भाषणात आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नव्या शैक्षणिक धोरणात खेळाडूंना उदरनिर्वाहासाठी आवश्यक असलेली डिग्री मिळवता मिळवता आवडीचे शिक्षण घेण्याची मुभा देण्यात आली आहे. पुढील काळात स्पोर्ट्स हे एक यशस्वी करिअर म्हणून घडू शकते याची मला खात्री आहे. शासनाच्या माध्यमातून जे काही करणे आवश्यक आहे ते अधिकारी मंडळींच्या सहकार्याने करण्याचा आमचा प्रयत्न राहील.
या स्पर्धेत विविध वयोगटातील खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. स्पर्धेच्या माध्यमातून तरुणाईत क्रीडास्पृहा वाढवण्याचा उद्देश साधला गेला. कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडले.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply