Breaking News

शेकाप ग्रामपंचायत सदस्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल ः रामप्रहर वृत्त
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून शेतकरी कामगार पक्षाला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. शेकापचे तुराडे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य विलास पाटील यांनी समर्थक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह रविवारी (दि. 26) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
पनवेल मार्केट यार्डमधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या पोयंजे पंचायत समितीच्या आढावा बैठकीत हा पक्षप्रवेश झाला. या वेळी भाजपचे ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आणि राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे भाजपमध्ये स्वागत केले.
आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली पनवेल आणि उरण मतदारसंघात भाजपकडून विविध विकासकामे होत आहेत. त्यांचे सक्षम नेतृत्व आणि कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून अनेक पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल होत आहेत. याच अनुषंगाने तुराडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच चंद्रकांत भोईर यांच्या नेतृत्वाखाली विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विलास पाटील तसेच नागेश पाटील, प्रवीण जाधव, प्रकाश शिंदे, भीमराव कुंभार, बासू राठोड, राजू राठोड, सुनील राठोड, लक्ष्मण कोकाटे, राम कोकाटे, प्रेम राठोड, दिनेश कांबळे, किरण राठोड, अजय कोकाटे, नवनाथ त्रिभोन, महेश दोडमणी, संतोष कोकाटे, रवि जेबाशी, राजू मुन्ना राठोड, प्रशांत ओव्हळ यांनी विकासाचे ‘कमळ’ हाती घेतले.
या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजप तालुका सरचिटणीस तथा जि.प.चे माजी सदस्य राजेंद्र पाटील, माजी पं.स. सदस्य जगदीश पवार, माजी नगरसेवक बबन मुकादम, भाजपचे दक्षिण मंडळ अध्यक्ष मंगेश वाकडीकर, तालुका उपाध्यक्ष प्रवीण खंडागळे, तानाजी खंडागळे, उत्तर कार्यकारिणी सदस्य देविदास पाटील, भाताण ग्रामपंचायतीचे सरपंच तानाजी पाटील, जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष अविनाश गाताडे, पंचायत समिती विभागीय अध्यक्ष प्रतिक भोईर, दक्षिण मंडळ महिला अध्यक्ष रेश्मा माळी, अनंता पाटील, बारवईचे सरपंच निलेश बाबरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
या प्रवेशानंतर भाजप दक्षिण मंडळ कार्यकारिणी सदस्यपदी कृष्णा जुमारे, बूथ क्रमांक 90च्या अध्यक्षपदी अरुण पाटील आणि पोयंजे गाव कमिटी उपाध्यक्षपदी अशोक भोईर यांची नियुक्ती झाल्याबद्दल जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आणि राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांनी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीसपदाची मोठी जबाबदारी

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा …

Leave a Reply