Breaking News

पनवेल महापालिकेच्या माध्यमातून वेगाने विकासकामे -आमदार प्रशांत ठाकूर

कळंबोलीत दैनिक बाजार, खेळाच्या मैदानाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिकेची स्थापन झाल्यापासून अनेक विकासकामे वेगाने सुरू आहेत. सिडकोलादेखील परिसराचा इतका विकास करता आला नाही जितका विकास महापालिकेच्या माध्यमातून झाला आहे. त्यामुळे येणार्‍या काळातही आपल्याला अधिक ताकदीने काम करून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहेत, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी कळंबोलीमध्ये दैनिक बाजारांच्या भूमिपूजनावेळी केले.
पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासाची कामे वेगाने सुरू आहेत. त्यानुसार कळंबोलीमध्ये 14 भूखंडांवर दैनिक बाजार बांधण्यात येणार असून हे काम महापालिकेच्या 15 कोटी 39 लाख 25 हजार 315 रुपयांच्या निधीमधून केले जाणार आहे. त्याचे भूमिपूजन तसेच दोन कोटी 91 लाख रुपयांच्या निधीमधून बांधण्यात येणार्‍या खेळाच्या मैदानाच्या कामाचा शुभारंभ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि. 10) झाला.
या कार्यक्रमास माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक रवींद्र भगत, बबन मुकादम, राजेंद्र शर्मा, माजी नगरसेविका प्रमिला पाटील, जिल्हा चिटणीस रविनाथ पाटील, कळंबोली मंडळ अध्यक्ष अमर पाटील, अशोक मोटे, महाराष्ट्र वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभूदास भोईर, विजय भोईर, सुरेश भोईर, विष्णू गायकवाड, दर्शन पाटील, मच्छिंद्र कुरुंद, दिलीप बिस्ट, अमर ठाकूर, महिला मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष प्रिया मुकादम, दुर्गा सहानी, गौरी कोरडे, विद्या फरांदे, कविता चव्हाण, लैला चांद पाशा, सुलभा साखरे, गौरव नाईक यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये नागरिकांनी जो विश्वास आपल्यावर दाखवला, तोच विश्वास येणार्‍या महापालिका निवडणुकीमध्येही महायुतीवर दाखवतील, असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी व्यक्त केला.

Check Also

उलवेतील रामशेठ ठाकूर मैदानावर कबड्डीचा थरार!

पनवेल ः रामप्रहर वृत्तसंघभावना, अचूक रणनीती, वेगवान चढाया आणि बचावातील नियंत्रण यांचा रोमांचक संगम उलवे …

Leave a Reply