Breaking News

महापालिका कर्मचार्‍यांना आश्वासित प्रगती पदोन्नती योजनेचा तत्काळ लाभ द्या

माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिकेच्या विविध विभागातील कर्मचार्‍यांना आश्वासित प्रगती पदोन्नती योजनेचा तत्काळ लाभ देण्याची मागणी माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पनवेल महापालिकेमध्ये विविध विभागात कार्यरत असलेले कर्मचारी तसेच सफाई कर्मचारी यांनी अनेक वर्षांपासून इमानेइतबारे सेवा बजावली आहे. शासनाच्या धोरणानुसार (आश्वासित प्रगती पदोन्नती योजना) 10 वर्षे, 20 वर्षे, 30 वर्षे सेवा पूर्ण झाल्यावर लागू असतानाही प्रत्यक्षात अनेक कर्मचार्‍यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्मचार्‍यांच्या सेवेत उत्साह टिकवून ठेवण्यासाठी व त्यांना न्याय देण्यासाठी सदर योजना तत्काळ राबविणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरुन या कर्मचार्‍यांना आपल्या केलेल्या सेवेचा योग्य तो मोबदला मिळण्यास मदत होईल. त्यामुळे कामगारांच्या बाबतीत या महत्वपूर्ण विषयावर लक्ष केंद्रित करून महापालिका प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून सर्व पात्र कर्मचार्‍यांना आश्वासित प्रगती पदोन्नती (10 वर्षे, 20 वर्षे व 30 वर्षे) योजनेचा लाभ लवकरात लवकर देण्याकरीता योग्य ती कार्यवाही करावी.

Check Also

पनवेलमध्ये ८ ऑगस्टला महारोजगार मेळावा

दहावीपासून पदव्युत्तर, कुशल उमेदवारांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी पनवेल ः रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना नामांकित कंपन्या …

Leave a Reply