Breaking News

विविध सुविधांच्या माध्यमातून पनवेल अद्ययावत होण्यासाठी प्रयत्न

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचे प्रतिपादन

पनवेल ः रामप्रहर वृत्त
शासन संवेदनशील असल्याने ते जनतेपर्यंत पोहचून सेवा देते. प्राण्यांच्या बाबतीतही संवेदनशील असलेल्या पनवेल महानगरपालिकेचे झिरो रेबीज निर्मूलन अभियान कौतुकास्पद आहे. अशा विविध सुविधांच्या माध्यमातून पनवेल अद्ययावत नगर होण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले.
पनवेल महापालिका पशुवैद्यकीय विभागामार्फत आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली झिरो रेबीज निर्मूलन कार्यक्रमांतर्गत शहरातील सर्व पाळीव प्राण्यांसाठी मोफत रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण व आरोग्य तपासणी शिबिर रविवारी (दि. 7) नवीन पनवेलमधील जागृती सभागृहात मिनिस्ट्री ऑफ पेट्स आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर बोलत होते. महापालिकेने या माध्यमातून पाळीव प्राण्यांना चांगल्या प्रकारे आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत तसेच पाळीव श्वानांसाठी फिरते रुग्णालयही सुरू केले आहे याबद्दल त्यांनी कौतुक केले.
या शिबिरास माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान गीते, डॉ. मधुलिका लाड, माजी नगरसेविका राजश्री वावेकर, वृषाली वाघमारे, मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. राजू पाटोदकर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
देशात दरवर्षी रेबीजमुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचे मृत्यू होत असून त्यापैकी बहुसंख्य प्रकरणे संक्रमित प्राण्यांच्या चाव्यामुळे होतात. रेबीज हा प्रतिबंधात्मक आजार आहे. प्राण्यांचे वेळेवर लसीकरण हा यावर सर्वात प्रभावी उपाय आहे. याच उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. या वेळी सुमारे 225 पाळीव मांजरी व श्वानांचे रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले.
राष्ट्रीय पातळीवरील नॅशनल अ‍ॅक्शन फॉर डॉग मेडिकेटेड रेबीज इलिमेशन 2030 अंतर्गत हा उपक्रम सुरू असून पनवेल महापालिका शून्य रेबीज या उद्दिष्टाकडे वाटचाल करत आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीसपदाची मोठी जबाबदारी

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा …

Leave a Reply