पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील नितळस गावामध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीमधून सुमारे 30 लाख रुपयांच्या निधीमधून अंतर्गत रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. या कामांचे भुमीपूजन भाजप नेते एकनाथ देशेकर यांच्या हस्ते गुरुवारी (दि.11) झाले.
दरम्यान काही दिवसांपुर्वी विरोधकांनी या कामाचे श्रेय घेण्यासाठी रस्त्याच्या कामाचे भुमपूजन केले होते. याबाबत दिनेश खानावकर म्हाणाले की, फक्त नारळ फोडून काम होत नाही त्यासाठी पाठपुरावा करावा लगतो. जनता सुज्ञ आहे, ती भुलथापांना बळी पडत नाही. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मुळेच आपल्या पसिरामध्ये विकासकामे होत आहेत असे सांगीतले.
पनवेल विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील पायाभुत सुवीधा अधिक मजबूत होत आहेत. त्यापार्श्वभुमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीमधून आणि भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या प्रयत्नांमुळे नितळस गावातील अरविंद चौधरी यांच्या घरापासून ते बौद्धवाडी, प्रमोद भोईर यांच्या घरापासून ते बौद्धवाडी तसेच बौद्धवाडी मध्ये जाणार्या रस्त्याच्या काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे.
या कामाचे भुमीपूजन या कामांचे भुमीपूजन भाजप नेते एकनाथ देशेकर यांच्या हस्ते आणि भाजपचे पनवेल उत्तर मंडळ अध्यक्ष दिनेश खानावकर यांच्या उपस्थितीत झाले. या वेळी भाजपचे नेते एकनाथ देशेकर, पनवेल उत्तर मंडळ अध्यक्ष दिनेश खानावकर, बाळकृष्ण पाटील, अंकुश पाटील, नवनाथ खुटारकर, प्रकाश खैरे, राजेश पाटील, भगवान कडू, रवी गोंधळी, माजी सरपंच नंदु भोपी, अमृता मढवी, सदस्य सुमीता काठे, दर्शना पावशे, कैलास मढवी, भार्गव सांगडे, धर्मा पावशेम धनाजी काठे, नारायण काठे, शैलेश पावशे, राजाराम गायवाड, फुलाजी म्हात्रे, मंगळदास म्हात्रे, दर्शन म्हात्रे, बाळु काठे, रुपेश पावशे, साजन पावशे, मारुती सांगडे परशुराम भोपी, दशरथ सांगडे, हरी काठे, गुरुनाथ महाराज, प्रकाश मढवी, राहुल काठे, संकेत पावशे, दिनेश पावशे, चंद्रकांत म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
Check Also
सुभाष घईंच्या दिग्दर्शनाची यशस्वी पन्नाशी
तुम्हालाही माहित्येय आज आपण डिजिटल युगात वावरतोय, चित्रपट माध्यमात व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढलाय, …
RamPrahar – The Panvel Daily Paper