Breaking News

एमटीएनएल, बीएसएनएलमधील सेवानिवृत्त कर्मचार्यांचा सत्कार

पनवेल ः प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी पनवेल व पनवेल महापालिकेचे नगरसेवक एकनाथ गायकवाड यांच्या वतीने एमटीएनएल आणि बीएसएनएलमधील सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचा सत्कार समारंभ सोहळा सोमवारी (दि. 10) संपन्न झाला. या समारंभास भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि सुप्रसिद्ध सिनेअभिनेते जयराज नायर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. खांदा कॉलनी येथील श्रीकृपा हॉल येथे एमटीएनएल आणि बीएसएनएलमधील सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचा सत्कार समारंभ सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सर्व सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्माचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सोहळ्यास पनवेल महापालिका प्रभाग समिती ‘ब’ अध्यक्ष संजय भोपी, नगरसेवक मनोहर म्हात्रे, एकनाथ गायकवाड, चंद्रकांत कांबळे, शशिकांत कांबळे, प्रकाश खानावकर, जितेंद्र माने, संतोष लेरणकर, अविनाश गायकवाड, सचिन गायकवाड, अनिता सरसकर, राखी पिंपळे, अ‍ॅड. खंडागळे यांसह मान्यवर उपस्थित होते.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply