पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग क्र. 14 मधील बंदर रोड व विट सेंटर येथील रस्ता खड्डेमय झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी नागरिकांनी येथील नगरसेवक मुकित काझी यांच्याकडे केली आहे. यावर पावसाळ्यानंतर खड्डे बुजविण्यात येणार असल्याचे नगरसेवक मुकित काझी यांनी सांगितले आहे.
या मोहल्ला परिसरात नगरसेवक मुकीत काझी यांच्या प्रयत्नाने अंडरग्राउंड गॅसलाइन टाकण्यात आली आहे. याचा फायदा या भागातील रहिवाशांना होणार असून त्यांच्या फ्लॅटमध्ये थेट गॅस लाइन मिळेल. या गॅसलाइनसाठी परिसरातील रस्ते खेदण्यात आले होते. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच हे काम करण्यात आले होते. त्यानंतर पाऊस सातत्याने असल्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करता येत नाही, मात्र पावसाळ्यानंतर खड्डे बुजवणार असल्याचे नगरसेवक मुकित काझी यांनी सांगितले.
Check Also
वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश
पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …
RamPrahar – The Panvel Daily Paper