Breaking News

पनवेल महापालिका क्षेत्रात 308 कोटींच्या विकासकामांचे सोमवारी भूमिपूजन व लोकार्पण

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सोहळा

पनवेल ः रामप्रहर वृत्त
कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विशेष प्रयत्नाने पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये 308 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते येत्या सोमवारी (दि. 15) सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 3पर्यंत विविध ठिकाणी करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेत आयुक्त व प्रशासक मंगेश चितळे आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. 12) आढावा बैठक झाली.
भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर, उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी, भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस नितीन पाटील, महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शनिवारी महापालिकेत बैठक झाली. या बैठकीस आयुक्त व प्रशासक मंगेश चितळे आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, शहर अभियंता संजय कटेकर, उपायुक्त मंगेश गावडे, स्वरूप खारगे, अभिषेक पराडकर, पाणीपुरवठा अभियंता विलास चव्हाण, भाजप जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी पनवेल शहराध्यक्ष अनिल भगत, भाजप खारघर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील, कामोठे मंडळ अध्यक्ष विकास घरत, कळंबोली मंडळ अध्यक्ष अमर पाटील, पनवेल शहर मंडळ अध्यक्ष सुमित झुंझारराव, नवीन पनवेल मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे, तळोजा मंडळ अध्यक्ष दिनेश खानावकर, माजी नगरसेवक अजय बहिरा, तळोजा मंडळ उपाध्यक्ष निर्दोष केणी, ज्येष्ठ कार्यकर्ते जगदीश घरत उपस्थित होते. विविध विकासकामांद्वारे नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात बैठकीत विचारविनमय करण्यात आला तसेच सोहळ्याचे नियोजन करण्यात आले.

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply